वृत्तसंस्था/ इसेक्स
इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱया इसेक्स क्रिकेट क्लबने 47 वर्षीय नीक लेवीसची आपल्या संघाच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या लेवीसने यापूर्वी व्हिक्टोरिया आणि मेलबर्न रेनिगेड्स या क्रिकेट संघांचे गोलंदाज प्रशिक्षकपद भूषविले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या लेविसने आपल्या प्रथमश्रैणी क्रिकेटला 1999 साली प्रारंभ केला होता. त्याने 2005 साली वनडे क्रिकेटमध्ये आपले पदार्पण न्यूझीलंड संघाविरूद्ध केले होते. 2013 साली लेवीस मेलबर्न रेनीगेड्स संघाचे प्रमुख गोलंदाज प्रशिक्षक होते. इंग्लीश कौंटी क्रिकेटच्या आगामी हंगामात इसेक्सच्या संघाला लेवीस यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.