प्रतिनिधी/इस्लामपूर
उरुण तलाठी आणि मंडलअधिकारी यांच्यातील वाद विकोपाला गेला असून मंगळवारी दोघांत वादावादी झाली.मंडल अधिकारी कैलास कोळेकर याने तलाठ्याची कॉलर पकडून हाताने ठोसे मारल्याची घटना घडली.ही घटना महसूल नायब तहसीलदार यांच्या केबिनमध्ये घडली. त्यामुळे वाळवा महसूल विभागाचा कारभार वेशीवर टांगला गेला.
अशोक सदाशिव लोणीष्ठे (४७,रा.निनाईनगर, इस्लामपूर)असे तलाठी यांचे नाव आहे.तलाठी लोनिष्टे हे कोळेकर याला नोंदीचे काम दाखवत असताना,दोघांत वाद झाला.दरम्यान कोळेकर याने लोणीष्टे यांच्या तोंडावर व पोटात बुक्कीने मारहाण केली.या दोघांत गेल्या काही दिवसांपासून वाद आहे. गेल्या महिन्यात उरुण चावडीत त्यांच्यात वाद झाला होता.पण वरिष्ठांनी हा प्रकार गांभीर्याने न घेतल्याने मंगळवारी नायब तहसीलदार यांच्या केबिनमध्ये पुन्हा हा प्रकार घडला.लोणीष्टे यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली.याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंद झाला आहे.