ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीच्या खान मार्केट परिसरातील ‘लोकनायक भवन’ या ईडीच्या मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.
ईडीच्या पाच अधिकाऱ्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने ईडीचे मुख्यालय सॅनिटाईझ करून सील करण्यात आले आहे. उद्यापर्यंत हे कार्यालय बंद असेल. कोरोनाबाधित पाच अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.