वार्ताहर /उचगाव
उचगाव येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण सोहळय़ाचे आयोजन मध्यवर्ती गणेश विठ्ठल मंदिरामध्ये करण्यात आले होते. श्रावण महिन्यामध्ये दरवषी दोन दिवसांचा पारायण सोहळा केला जातो. गुरुवर्य हभप परशुराम चौगुले महाराज अलतगा यांच्या कृपाशीर्वादाने सोमवार दिनांक 23 व मंगळवार 24 रोजी पारायण सोहळा पार पडला. या पारायणाची मुहूर्तमेढ हभप उमेश पावशे यांच्या हस्ते करण्यात आली.
सोमवारी सकाळी आठ वाजता पारायण सोहळय़ाचे उद्घाटन ग्रा.पं. अध्यक्ष जावेद जमादार यांच्या हस्ते ध्वजवंदन करून करण्यात आले. मंडपाचे फीत कापून उद्घाटन ग्रा.पं. सदस्य मोनापा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मंदिरातील विविध मूर्तींचे पूजन ग्रा.पं. सदस्य बाळकृष्ण तेरसे, बळवंतराव पावशे, यादो कांबळे, हनुमंत बुवा, दत्ता बेनके, उपाध्यक्ष मथुरा तेरसे, गजानन नाईक, सूरज सुतार, योगिता देसाई, स्मिता खांडेकर, नागरत्ना कोरडे, रूपाली गिरी, रूपा गोंधळी, माधुरी पाटील, अमरीन बंकापुरे यांच्या हस्ते करण्यात आले.
पारायण मंडळाच्यावतीने सर्व ग्रा.पं. सदस्यांचा शाल, श्रीफळ देऊन व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. दोन दिवस चाललेल्या या पारायणामध्ये सोमवारी संध्याकाळी हभप गुरुवर्य भाऊसाहेब पाटील महाराज यांचे कीर्तन झाले. या पारायण सोहळय़ाला ग्रा.पं. सदस्यांच्यावतीने 11,111 रुपयांची देणगी देण्यात आली.