उचगाव : उचगाव मराठी साहित्य अकादमी आयोजित रविवार दि. 24 जानेवारी रोजी होणाऱया 20 व्या उचगाव मराठी साहित्य संमेलनातील कवी संमेलनामध्ये भाग घेणाऱया कवींनी आपली नावे नोंदणी करावीत, असे आवाहन अकादमीचे अध्यक्ष कृष्णाजी कदम पाटील व सेक्रेटरी एन. ओ. चौगुले यांनी केले आहे.
या संमेलनातील तिसऱया सत्रामध्ये स्थानिक कवींना वाव देण्यासाठी यावर्षी सर्व कवींना आवाहन करण्यात आले आहे. कवी संमेलनामध्ये भाग घेणाऱया कवींनी उचगाव मराठी साहित्य अकादमीचे सेक्रेटरी एन. ओ. चौगुले यांच्याकडे पोस्ट अथवा प्रत्यक्ष शनिवार दि. 23 जानेवारीपर्यंत प्रत आणून द्यावी, असे कळविण्यात आले आहे. या कवी संमेलनामध्ये निवडक कवींचे निवड करून त्यांना कवी संमेलनात कविता सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे.
कवींनी एन. ओ. चौगुले, सेक्रेटरी उचगाव मराठी साहित्य अकादमी, उचगाव ता. जि. बेळगाव-591128, मो.-9845908082 या पत्त्यावर पोस्टाने कविता पाठवावी, असे कळविण्यात आले आहे.