वार्ताहर / गोकुळ शिरगाव
उजळाईवाडी (ता. करवीर) येथील एका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल गोरखनाथ सदाशिव केदारे (वय 52 वर्षे रा. मनेर मळा, उंचगाव) यांचा उपचारादरम्यान येथे मृत्यू झाला . मृत्यूनंतर बिलासाठी १४ तास बॉडी अडवल्याची तक्रार नातेवाईकांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जिल्हाध्यक्ष सतीश मागे यांच्याकडे केली. सतीश माळगे यांनी तात्काळ आता हॉस्पिटलमध्ये धाव घेत हॉस्पिटल प्रशासनाला धारेवर धरले असता मृतदेहाचा ताबा नातेवाइकांकडे देण्यास हॉस्पिटल प्रशासन तयार झाल्याचे नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान यासंबंधी सखोल चौकशी करून हॉस्पिटल वर कडक कारवाई करण्याची मागणी नातेवाईक व आरपीआय यांच्या वतीने करण्यात आली.
त्याबाबत नातेवाइकांकडून मिळालेली माहिती अशी की चार मे रोजी डेंगूच्या उपचारासाठी गोरखनाथ केदारे यांना या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. पाच तारखेला त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविला असता त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यावेळी नातेवाईकांना उपचारासाठी ऐंशी हजार रुपये भरण्यास सांगितले. दागिने गहाण ठेवून नातेवाईकाने सदर रक्कम हॉस्पिटलमध्ये भरल्याचे सांगितले. तसेच रेमडीसिवर,सेप्सीव्हॅक अशी महागडे इंजेक्शने व औषधे नातेवाईकांनी रुग्ण बरे व्हावे यासाठी आणून दिले परंतु उपचारादरम्यान मंगळवार( ता. ११)रोजी सायंकाळी आठ च्या दरम्यान गोरखनाथ केदारे यांचे हॉस्पिटलमध्ये निधन झाल्याचे हॉस्पिटल प्रशासनाकडून नातेवाईकांना सांगण्यात आले परंतु एकूण एक लाख ऐंशी हजाराची पैकी आगाऊ ८० हजार वजा जाता उर्वरित एक लाख बिला साठी नातेवाईकांना बॉडी ताब्यात देण्यास हॉस्पिटलने विलंब केल्याचे नातेवाइकांकडून सांगण्यात आले. दरम्यान या गोष्टीची कल्पना आरपीआयचे सतीश माळगे यांना नातेवाइकांनी दिली असता सतीश माळगे यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन हॉस्पिटल प्रशासनाला धारेवर जाताच तात्काळ मृतदेह ताब्यात देण्यास हॉस्पिटल प्रशासन तयार झाले.
हॉस्पिटल प्रशासनाकडून आरोपांचा इन्कार
हॉस्पिटलच्या मुख्य महिला कन्सल्टींग फिजिशियन यांनी मात्र नातेवाईकांनी केलेल्या सर्व आरोप खोटे असल्याच्या सांगत नातेवाईकांनी पूर्वी केलेल्या तपासणी प्रमाणे गोरख केदारे यांना डेंग्यू झाल्याचे निधन झाले होते त्यांचा एच आर सिटी रिपोर्ट ही वीस असल्यामुळे फुफ्फुसांमध्ये मोठ्या प्रमाणात जंतुसंसर्ग झाला होता. ता. ६ रोजी त्यांचा कोरोना रिपोर्ट ही पॉझिटिव्ह आला होता. डेंगू व कोरोना अशा दोन्ही रोगांचे निदान झालेल्या रुग्णांवर उपचार करणे क्लिष्ट व जोखमीचे अत्यंत जोखमीचे असते . याबाबत सर्व कल्पना नातेवाईकांना देण्यात आली होती प्रचलित सर्व आधुनिक संसाधनाद्वारे गोरखनाथ केदारे यांच्यावर उपचार करीत पेशंटला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न डॉक्टरांनी केला. परंतु मंगळवारी उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर संबंधित नातेवाईकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. कोणत्याही कारणासाठी गोरखनाथ केदारे यांचा मृतदेह अडवण्यात आला नाही. संपर्क होताच त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.