ऑनलाईन टीम / उत्तरकाशी :
उत्तराखंडातील उत्तरकाशीमध्ये काल रात्री उशिराने भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 3.4 रिश्टल स्केल एवढी होती.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 1 वाजून 28 मिनिटांनी उत्तराखंडातील उत्तरकाशीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र उत्तरकाशीपासून 23 किमी पूर्वेकडे होते. यामध्ये प्रकारची हानी झालेली नाही आहे. लोकांना भूकंपाची जाणीव होताच लोक घरातून बाहेर पडले.
यापूर्वी मागील महिन्यात प्रदेशातील पिथोरगडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाची तीव्रता 3.7 रिश्टल स्केल एवढी होती.