ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात मागील 24 तासात 53 रुग्णांचा मृत्यू झाला तर 2 हजार 991 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यातच चमोली, चंपावत, नैनिताल आणि उधमसिंह नगर जिल्ह्यातील अनेक रुग्णालयांनी काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे जीव गमावलेल्या 40 रुग्णांचा रिपोर्ट दिला आहे. तर प्रदेशातील एकूण संख्या 3,21,337 वर पोहचली आहे.

तर कालच्या 4 हजार 854 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे प्रदेशात एकूण रुग्णांची संख्या 3 लाख 07 हजार 566 इतकी झाली आहे. यातील 2 लाख 33 हजार 266 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात 33,765 नमुने निगेटिव्ह आले आहेत. काल देहरादून जिल्ह्यात 414 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर उधमसिंह नगर 383, हरिद्वारमध्ये 283, नैनिताल 370, उत्तरकाशीमध्ये 79, पौडीमध्ये 194, टिहरी 196, अल्मोडा 149, रुद्रप्रयाग 98, चमोली 175, चंपावत 28, पिथोरागडमध्येे 122 आणि बागेश्वर जिल्ह्यात 68 रुग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान, प्रदेशात आतापर्यंत 6,113 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत प्रदेशात 43,520 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.84 % तर मृत्यू होण्याचे प्रमाण 1.90 % इतके आहे.