ऑनलाईन टीम / हरिद्वार :
उत्तराखंडातील हरिद्वार जिल्ह्यात मंगळवारी भूकंपाचे धक्के जाणवले. मंगळवारी सकाळी 09 वाजून 41 मिनिटांनी हा भूकंप झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. लोकांना भूकंपाची जाणीव होताच लोक घरातून बाहेर पडले.
मौसम विभगाचे रिसर्च सुपरवायजर नरेंद्र रावत यांनी सांगितले की, आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप 7 सेकंद जाणवला, याची तीव्रता 3.9 रिश्टल स्केल एवढी होती.