बेंगळूर/प्रतिनिधी
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) उत्तर कर्नाटकातील १० जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह, जोरदार मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. बंगालच्या उपसागरात, ५५-६५ किमी प्रतितास वेगाच्या वाऱ्याने आंध्र प्रदेशच्या काही भागात फिरून दिशा बदलल्याने कर्नाटकात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
यामध्ये बागलकोट, गदग, हवेरी, विजापूर, धारवाड, बेळगाव, रायचूर, गुलबर्गा आदी जिल्ह्यांसाठी बुधवार आणि गुरुवारी भारतीय हवामान विभागाने रेड अलर्ट जरी केला आहे.