ऑनलाईन टीम / लखनऊ :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. उत्तर प्रदेशात देखील चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच शुक्रवारी प्रदेशचे आरोग्य मंत्री जय प्रताप सिंह यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सोबत अनेक बैठकींना हजेरी लावली होती.
याआधी गुरुवारी राजधानीत तीन वृद्धांसह सहा जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यामधील तिघे जण लखनऊ मधील तर अन्य तीन जण दुसऱ्या जिल्ह्यातील आहेत. यासह उन्नाव च्या माजी खासदार सह 307 जणांना कोरोना ची बाधा झाली आहे.
सध्या केवळ लखनऊमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 5426 वर पोहोचला आहे. तर 161 जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.