ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. रविवारी प्रदेशात आतापर्यंतच्या सर्वाधिक म्हणजेच 1155 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 26,554 इतकी आहे, अशी माहिती अविनाश कुमार अवस्थी यांनी दिली.

ते म्हणाले, उत्तर प्रदेशात आतापर्यंत 18,761 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आता पर्यंत 175 जणांनी आपला जीव गमावला आहे. सध्या 8161 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कालच्या दिवशी उत्तर प्रदेशात 29,117 टेस्ट करण्यात आल्या.
रविवारी लखनऊमधील सिव्हील हॉस्पिटलचे 9 कर्मचारी आणि डीआयजी जेल संजीव त्रिपाठी हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर तालकटोरा मधील होमिओपॅथिक डॉक्टर जावेद यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 102 ॲम्ब्युलन्स कॉल सेंटरच्या 32 कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाचासंसर्ग झाला आहे. त्यामुळे कॉल सेंटरची संपूर्ण बिल्डिंग 48 तासांसाठी सील करण्यात आली आहे.