हल्याचा केला खासदार उदयनराजेंनी घेतला खरपूस समाचार
प्रतिनिधी/ सातारा
भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे पुणे महानगरपालिकेत भ्रष्टाचाराबाबत आयुक्तांची भेट घेण्यासाठी पुण्यात आले असताना कार्यालयाच्या पायऱयावर त्यांना काल काही शिवसैनिकांनी ढकलून देत धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला होता. त्यामध्ये सोमय्या हे जखमी झाल्याने त्यांना संचेती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची भेट खासदार उदयनराजे यांनी घेऊन त्यांची आपुलकीने चौकशी करुन हल्याचा तीव्र शब्दात खासदार उदयनराजेंनी समाचार घेतला.
खासदार उदयनराजेंनी रविवारी सकाळीच किरीट सोमय्या यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, माजी खासदार किरीट सोमय्या हे सातत्याने भ्रष्टाचाराची पोल खोलत असल्याने त्यांच्यावर झालेला प्राणघातक ठरणारा हल्ला अतिशय निंदनीय आहे. सोमय्यांच्या मुद्यांचा विरोध मुद्याने केला गेला असल्याने लोकशाही संकटात सापडली आहे. असा हल्ला करुन किरीट सोमय्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न झाला आहे. ही घटना म्हणजे वैचारिक महाराष्ट्रातील लोकशाहीची अधोगती आणि झुंडशाहीची नांदी आहे. देशातील कोणत्याही व्यक्तीवर अशा हल्याच्या घटना घडल्यास अशा घटनांचे कोणीही समर्थन करु शकणार नाही, अशा शब्दात समाचार घेतला.