अधिकाधिक लोकांना लस मिळावी म्हणून प्रयत्न
प्रतिनिधी / पणजी
येत्या 26 मे पासून गोव्यात पुन्हा एकदा ‘टिका उत्सव’ सुरू करण्याचे सरकारने ठरविले असून तो पंचायती-पालिकेत होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. 45 वर्षावरील सर्व लोकांना प्रथम डोस मिळावा म्हणून ही मोहीम असून ज्यांनी पहिला डोस घेतला आहे त्यांना 16 आटवडय़ानंतर पुन्हा दुसरा डोस घ्यायचा आहे. त्यांची व्यवस्थाही त्या टिका उत्सवात करण्यात आली आहे. 18 ते 44 वयोगटातील लोकांसाठी सरकार लवकरच लसीकरण कार्यक्रम जाहीर करणार असून सरकारला सर्वांची काळजी असल्याचा दावा डॉ. सावंत यांनी केला आह
गोव्यात 18 ते 44 वयोगटातील सुमारे 31000 जणांना कोरोना प्रतिबंधक लसीचा प्रथम डोस दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गोव्यात वरील वयोगटासाठी 15 मे पासून लसीकरण सुरू झाले असून 10 दिवसात 30000 पेक्षा अधिकजणांनी लस घेतल्यने तरूण वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान गोव्यात आतापर्यंत 3,90,000 जणांनी प्रथम डोस घेतला असून 94,683 जणांनी दुसरा डोस घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 18 ते 44 वयोगटासाठी पुन्हा एकदा मोहीम आखण्यात येणार आहे.