ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत माहिती दिली की, दिल्लीत देखील 18 वर्षांवरील सर्वांना लवकरच लसीकरण करण्यास सुरुवात केली जाणार आहे. पुढे ते म्हणाले, सद्य स्थितीत दिल्लीतही लसी उपलब्ध नाही आहेत. मात्र दोन तीन दिवसात कोविशिल्ड लसीचे जवळपास 3 लाख लस दिल्लीत येणार आहेत.

पुढे केजरीवाल म्हणाले की, दिल्लीत आम्ही तीन महिन्यात लसीकरण मोहीम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली आहे. आता आम्ही फक्त लस मिळण्याची वाट बघत आहोत. सिरम आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांना 66-66 लाख लसींची ऑर्डर दिली आहे.
यासोबत केजरीवाल यांनी दिल्लीकरांना आवाहन केले आहे की, सगळ्यांना लस मिळणार आहे. त्यामुळे कोणालाही घाबरायची गरज नाही. पुढे ते म्हणाले, आपण सर्वांनी आता पर्यंत जसे आम्हाला सहकार्य केले आहे, तसेच सहकार्य पुढील काळातही करावे. आम्ही सतत लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क करीत आहोत. लस उपलब्ध झाल्यावर तात्काळ लसीकरण सुरू केले जाईल.