वारणानगर / प्रतिनिधी
उद्योगी महिलांचा व्यवसायाच्या माध्यमातून विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी नंदू नाईक यानी केले.बहिरेवाडी ता. पन्हाळा येथे उद्योग व्यवसाय करणाऱ्या महिलासाठी कुक्कुटपालन व्यवसायाचे एक दिवशीय प्रशिक्षण नाबार्ड, माहिला आर्थिक विकास महामंडळ, प्रेरणा लोकसंचलीत साधन केंद्र – वाठार यांच्या संयुक्त विद्यमानाने पार पडले.
या प्रसंगी बोलताना नाईक यांनी हे प्रतिपादन करून माहिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचलीत साधन सुविधा केंद्रामार्फत बचत गटाच्या माध्यमातून महिलांना अनेक व्यवसाय नाबार्डने उपल्बध करुन दिले आहेत. गटाच्या आर्थिक व्यवहाराचा ताळेबंदाचा डाटा संकलीत करण्यासाठी नाबार्ड मार्फत ” ई शक्ती ” डाटा प्रणाली दिली असून गावोगावी माहिला व्यवसायात याव्यात छोट्या मोठ्या व्यवसायातून त्यांचा आर्थिक स्थर वाडावा यासाठी नाबार्ड सातत्याने सकारात्मक काम करीत असल्याचे सांगून यामध्ये महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.
राज्य महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा समन्वयक बाळासाहेब झिंझाडे यांच्या संचलनाखाली जिल्ह्यातील सर्वच साधन सुविधा केंद्राच्या कक्षेतील सर्व बचत गटातील महिलासाठी त्यांच्या आवडीनुसार व उपल्बध सुविधेचा विचार करून व्यवसाय उभे करून दिले जात आहेत. असे लोक साधन सुविधा केंद्राचे व्यवस्थापक सचिन पाटील यानी प्रास्ताविकात सांगितले.
महिला गटासाठी व्यवसायाला स्वतंत्र कर्ज देखील उपल्बध करून दिले जात आहे. महिलांना आर्थिक साक्षर करण्यासाठी सातत्याने प्रबोधन करण्यात येत असल्याचे जिल्हा मध्यवर्ती बैंकेचे वारणानगर शाखेचे निरीक्षक सुंदर सावंत, बँक ऑफ इंडियाचे अधिकारी उदय जोशी यानी सांगितले.
डी.वाय. पाटील कृषी विज्ञान केंद्र तळसंदेचे सुधीर सुर्यगंध,महिला आर्थिक विकास महामंडळाचे सहा. सनियंत्रण अधिकारी उमेश लिंगणूरकर, कुकुटपालन उदयोजक श्री. लुगडे यानी कुक्कट पालन संगोपन, रोग व व्यवसाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.प्रेरणा लोक साधन सुविधा केंद्राच्या अध्यक्ष शारदा गवंडी उपस्थित होत्या. सहयोगीनी विमल जाधव यानी सूत्रसंचलन व शकुतंला पाटील यांनी आभार मानले.