हजारो महिलांना मिळाला रोजगार : राज्यातील 6024 ग्राम पंचायतींपैकी कंग्राळी बुदुक पहिल्या स्थानी, सर्वत्र अभिनंदन
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव तालुक्मयात उद्योग खात्री योजनेतून वेगवेगळय़ा कामांना गती देण्यात आली. हजारो महिलांना रोजगार मिळाला आहे. त्यामुळेच बेळगाव तालुका उद्योग खात्री योजनेतून महिलांना काम देण्यासाठी अव्वल ठरला आहे. या बरोबरच राज्यातील 624 ग्रामपंचायतींपैकी बेळगाव तालुक्मयातील कंग्राळी बुद्रुक या ग्रामपंचायतीनेही महिलांना काम देण्याच्या बाबतीत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यामुळे सर्वत्रच अभिनंदन करण्यात येत आहे.
बेळगाव जिल्हा पंचायतीमधील मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांनाही उत्तम काम केल्यामुळे गौरविण्यात आले आहे. बेळगाव जिल्हा पंचायतीने उत्तमरित्या काम केल्यामुळे त्यांना गौरविण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे उद्योग खात्री योजनेतून विविध महिलांना काम मिळावे यासाठी तालुक्मयातील सर्व पीडीओ आणि इतरांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे.
उद्योग खात्रीतून महिलांना काम
उद्योग खात्री योजनेतून विविध महिलांना काम उपलब्ध करून देण्यात आले. याचबरोबर तालुक्मयाचा विकास कसा साधता येईल, याबाबत प्रयत्न करण्यात आले आहेत. उद्योग खात्रीतून ग्रामीण भागातील शेताकडे जाणारे पाणंद रस्ते, तलाव व छोटेखानी धरणे बांधून अनेकांचे लक्ष वेधून घेण्यात आले आहे. एकाच ठिकाणी पाच-पाच तलावांची निर्मिती करून जंगल भागातून येणारे पाणी अडविण्यात आले आहे. याचबरोबर त्याच्या बाजुने वनराईसाठी झाडेही लावण्यात आली आहेत. याचबरोबर इतर कामे करण्यात आली आहेत.
तालुका पंचायत अव्वल
तालुक्मयातील दररोज सुमारे 7 ते 10 हजार महिलांना काम उपलब्ध करून देण्यासाठी तालुका पंचायत व ग्रामपंचायत अधिकाऱयांची धडपड सुरू असते. तरीही काही महिलांना काम मिळत असल्याच्या तक्रारी महिलांनी तालुका पंचायतकडे केल्या आहेत. अशा तक्रारी होत असतानाही महिलांना काम देण्याच्याबाबत तालुका पंचायत अव्वल ठरली आहे. विकासाच्यादृष्टिकोनातून मोठे प्रयत्न सुरू झाले आहेत.
बेळगाव जिल्हय़ात सुमारे सर्वच तालुक्याने आपले उद्दिष्ट पूर्ण केले आहे. मात्र बेळगाव जिल्हय़ात उद्योग खात्री योजनेतून मोठय़ा प्रमाणात काम राबविल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सध्या येत्या दीड ते दोन महिन्यात पावसाला सुरुवात होणार आहे. त्या दृष्टिकोनातून वनखात्याच्या समवेत झाडे लावण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अनेक ठिकाणी खड्डे खोदाई करण्यात आली आहे. याबरोबरच इतर कामांना चालना देण्यात आली आहे. बेळगाव तालुक्मयात महिलांना काम देण्याच्यादृष्टीने मोठय़ा प्रमाणात चालना देण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत असून राज्यात बेळगाव तालुका महिलांना काम देण्यासाठी अव्वल ठरल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
अजूनही काम करण्यासाठी तत्पर

काम करण्यासाठी आपण 24 तास सज्ज असून त्या दृष्टिकोनातून आपले प्रयत्न सुरू आहेत. बेळगाव तालुका महिलांना काम देण्यासाठी अव्वल ठरला आहे. मात्र त्यासाठी सर्वांचे प्रयत्न आहेत. तालुक्मयातील सर्व महिलांना काम देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. बेळगाव तालुक्मयातील उद्दिष्ट पूर्ण केल्यानंतरही आपले विकासासाठीचे प्रयत्न सुरूच आहेत. बेळगाव तालुक्मयात उद्योग खात्री योजनेतून वेगवेगळय़ा माध्यमातून विकास करू आणि याला नागरिकांचेही सहकार्य तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आपण राज्यात महिलांना काम देण्यासाठी पहिला आलो आहोत. यापुढेही हे प्रयत्न सुरूच असतील.
– ता. पं. कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी