उन्हाळा म्हटला की रणरणतं ऊन, घाम आणि चिकटपणा आला. म्हणूनच या दिवसात ठराविक रंग आणि प्रिंट्सना प्राधान्य दिलं तर तुम्हाला आरामदायी वाटू शकतं.
- या दिवसात पांढर्या रंगाला प्राधान्य द्यायला हवं. पांढरे कुर्ते, टॉप्स वॉर्डरोबमध्ये असायला हवेत. यासोबतच पांढरा मॅक्सी ड्रेस, साडी, लखनवी, अनारकली, पेन्सिल स्कर्ट, ट्राउझरही तुम्ही कॅरी करू शकता.
- उन्हाळ्यात फ्लोरल प्रिंटची चलती असते. तुम्ही पावसाळ्यातही फ्लोरल्स कॅरी करू शकता. मात्र या दिवसात फिकट रंगाचे फ्लोरल प्रिंटचे कपडे शोभून दिसतात. फ्लोरल्ससह चेक्स, स्ट्राईप्स, जिओमॅट्रिकल प्रिंट्सही कॅरी करता येतील.
- या दिवसात फार घट्ट कपडे घालू नका. उन्हाळ्यात शॉर्ट ड्रेस, मॅक्सी ड्रेस, कॉटन टी शर्ट, पायजमा, पलाझो, लाँग कुर्ता, प्लेटेड स्कर्ट, पांढरा शर्ट, लिनन जॅकेट, कॉटन साडय़ा घालता येतील.
- संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी किंवा पार्टीसाठी काळ्या रंगाऐवजी गोल्डन किंवा सिल्व्हरला पसंती द्या. शिफॉन, जॉर्जेट रॉ सिल्कचा वन शोल्डर, ऑफ शॉल्डर शॉर्ट ड्रेस किंवा मॅक्सी ड्रेस घालता येईल.
- उन्हाळ्यात लग्नप्रसंगी फार जड किंवा गडद रंगाचे कपडे घालणं त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे सोनेरी, चंदेरी रंगाच्या कपडय़ांसोबत पिच, पिस्ता, लाईट येलो, ग्रे अशा पेस्टल रंगाचे कपडे घालता येतील.