आनंद महिंद्रा यांनी दिली ऑफर
देसी सायकलला वेगवान करण्याचे स्वप्न साकार करणारे एक उपकरण उद्योजक आनंद महिंद्रा यांनी अत्यंत पसंत पडल्याने त्यांनी यात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. हे उपकरण ध्रूव विद्यूतने तयार केले आहे. ध्रूव विद्यूतचे संस्थापक गुरसौरभ सिंह यांचे उपकरण अत्यंत टेक सेव्ही आहे. हीरो किंवा ऍटलस सायख्या कंपन्यांच्या सामान्य सायकल्सना इलेक्ट्रिक सायकलमध्ये रुपांतरित करणारे हे उपकरण आहे. या उपकरणाचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे याच्यासाठी सायकलमध्ये कुठलेच मॉडिफिकेशन करावे लागत नाही. म्हणजेच सायकलमध्ये कुठेच कटिंग करावे लागत नाही, सायकलमध्ये पॅडलवर नट बोल्टने ते बसविण्या येते.

हे उपकरण देसी सायकलला कमाल 25 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने धावण्याची संधी देते. एवढेच नाही तर 20 मिनिटे पॅडल मारल्यावर याची बॅटरी 50 टक्के चार्ज होते. तसेच एकदा फुल चार्ज झाल्यावर 40 किलोमीटरपर्यंत धावू शकते. 170 किलोग्रॅमपर्यंत वजन वाहून नेण्याची यात क्षमता आहे. हे उपकरण आग तसेच पाण्याने प्रूफ आहे. शेती तसेच चिखलाताही ही सायकल आरामात धावू शकते. याचबरोबर यात फोन चार्ज करण्याचीही सुविधा आहे.
महिंद्रांची गुंतवणुकीची इच्छा
गुरसौरभ सिंह यांच्या उपकरणाने आनंद महिंद्रा अत्यंत प्रभावित झाले असून त्यांनी यासंबंधी तीन मोठे ट्विट केले आहेत. ध्रूव विद्युतमध्ये गुंतवणूक करून आनंद होईल असे त्यांनी म्हटले आहे. तर ट्विटरवर लोकांना गुरसौरभ यांची भेट घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.