प्रतिनिधी / वारणानगर
कोरोना संसर्गाचे निमीत्त करून उपचार नाकारणाऱ्या डॉक्टराविरूध्द नागरिकांनी जनसुराज्य शक्ती पक्षाकडे तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन जनसुराज्य शक्ती पक्षाचे जेष्ठ नेते विजयसिंह जाधव यांनी केले आहे.
उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र या सरकारी यंत्रणेवर सद्या कोरोनामुळे ताण आहे. तरी देखील तिथे उपचार सुरू आहेत. तथापी खाजगी हॉस्पीटल व गांवात दवाखाने चालवणारे खाजगी डॉक्टर कोरोना विषाणू प्रादूर्भावाचे निमित्त करून थंडी,ताप, पोटदुखी यांसह अन्य साद्या आजारावर देखील उपचार करण्याचे टाळू लागले आहेत. काही डॉक्टर तर तपासणी न करता रूग्ण सांगेल त्या माहितीवर औषधे लिहून देत आहेत. यामुळे सर्व सामान्य जनतेला त्रास होऊ लागला आहे. जनतेचा हा त्रास कमी व्हावा यासाठी उपचार नाकारणाऱ्या डॉक्टरवर कडक कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे विजयसिंह जाधव यानी सांगीतले.
कोरोनामुळे सर्वसामान्य जनतेला कोरोना टेस्ट करून या त्यांचा रिपोर्ट आलेवर उपचार करूया असे सल्ले डॉक्टर देतात तीन दिवसाने कोरोनाचा रिपोर्ट मिळतो पाउसाळ्यात येणाऱ्या साथीच्या थंडी, ताप, खोकला यासह अन्य अजारात कोरोना तपासणी रिपोर्ट आलेवर उपचार डॉक्टर करायला लागले तर या साथीच्या आजाराने त्रस्त झालेल्या रुग्णांचे हाल काय होतील याचा विचार करून मानवतेच्या दृष्टीने डॉक्टरानी सेवा दिली पाहीजे असे विजयसिंह जाधव यानी सांगून यासंदर्भाने नागरिकांनी उपचार नाकारत असलेल्या डॉक्टर संदर्भात आपआपल्या गांवातील, क्षेत्रातील जनसुराज्य शक्ती पक्षाचे सरपंच, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांच्याकडे तसेच पक्ष कार्यालयाकडे तक्रार नोंदवण्याची जाहिर आवाहन जेष्ठ नेते विजयसिंह जाधव यानी केले आहे.
Previous Articleहुपरी पोलिसांचा महाराष्ट्रात आदर्श उपक्रम – आ. राजू बाबा आवळे
Related Posts
Add A Comment