प्रतिनिधी/ बेळगाव
वकिली पेशा करताना समाजही शिक्षित व्हावा, कायद्याचे ज्ञान मिळावे यासाठी ज्ये÷ वकील ऍड. एस. बी. शेख यांनी तब्बल 15 पुस्तके लिहिली आहेत. तर आता सर्वसामान्य जनतेसाठी संपूर्ण कायद्याचे ज्ञान असलेले ‘कॉमन लॉ फॉर कॉमन पिपल’ हे पुस्तक लिहिले. याची दखल पाऊल्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, मेंडोझा-अर्जेंटिना यांनी घेतली. ऍड. एस. बी. शेख यांच्या आतापर्यंतच्या कार्याबद्दल त्यांना डॉक्टरेट प्रधान केली आहे. याबद्दल वकील क्षेत्राबरोबरच बेळगाव आणि संपूर्ण राज्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
केवळ व्यवसायातच न रमता वेगवेगळय़ा कायद्याच्या बाजूंचा अभ्यास करत ऍड. एस. बी. शेख यांनी 16 पुस्तके लिहिली आहेत. एका पुस्तकाचे प्रकाशन होणे बाकी आहे. सतत पुस्तक लिहिण्यामध्ये हे वकील कार्यरत असतात. यापूर्वी त्यांना आंतरराष्ट्रीय शांतता विद्यापीठतर्फे दुबई येथे डॉक्टरेट देण्यात आली होती. त्याचबरोबर जीव्हा टेक्नॉलॉजीकल ओपन युनिव्हर्सिटीने 10 मे 2018 रोजी त्यांना डॉक्टरेट पदवी दिली आहे. मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश थिरु भास्करन् यांच्या हस्ते डॉक्टरेट दिली होती.
न्यू दिल्ली येथील एका इंटरनॅशनल एज्युकेशन संस्थेच्यावतीने जिवेल ऑफ इंडिया हा पुरस्कार देण्यात आला आहे. ते वकिली बरोबरच 30 राष्ट्रीय बँकांमध्ये सल्लागार म्हणून काम पहात आहेत. गेली 20 वर्षे बी. व्ही. बेल्लद लॉ कॉलेजमध्ये गेस्ट लेक्चरल म्हणूनही काम केले आहे. नेहमीच वेगवेगळय़ा कायद्यांचा अभ्यास करत नवनवीन पुस्तके निर्माण केल्यामुळे त्याची दखल अनेक देशांनी घेतली असून त्यांना डॉक्टरेट देण्यात आली आहे. सध्या कोरोनामुळे त्या ठिकाणी त्यांना उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे पाऊल्स् इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी अर्जेंटिना यांनी 11 एप्रिल 2020 रोजी त्यांचे नाव त्या ठिकाणी जाहीर केले. त्यांना पुरस्कार व मानचिन्ह, प्रमाणपत्र पाठविले आहे.