प्रतिनिधी / बेळगाव
येथील प्रसिद्ध वकील ओमप्रकाश भवरलाल जोशी (नागोरी) यांनी नुकत्याच झालेल्या आयबीबीआय म्हणजेच इनसॉल्व्हन्सी बँकरप्ट्सी बोर्ड ऑफ इंडियाच्यावतीने घेण्यात आलेल्या लिमिटेड इनसॉल्व्हन्सी या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. लॉकडाऊनच्या काळाचा सदुपयोग करत त्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला. सहसा हा अभ्यासक्रम चार्टर्ड अकौंटंट किंवा कंपनी सेपेटरी पदवीप्राप्त विद्यार्थी पूर्ण करतात. मात्र, जोशी यांनी वकील असूनही हे यश मिळविले आहे. इनसॉल्व्हन्सी प्रोफेशनल म्हणून कार्यरत होणारे ते उत्तर कर्नाटकात तिसरे तर बेळगावमधील एकमेव आहेत. प्रसिद्ध व्यापारी सत्यनारायण जोशी यांचे ते कनि÷ बंधू असून या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.