नवी दिल्ली
ऍपल कंपनीने आपल्या आयफोन एसइ 3 (2022) चे उत्पादन घटवणार असल्याचे म्हटले आहे. युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर सदरच्या आयफोनच्या मागणीत अपेक्षीत प्रतिसाद मिळत नसलेने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कंपनी येत्या काळात या फोन्सचे उत्पादन 20 टक्के इतके कमी घेणार असल्याचे समजते. त्यामुळे तिमाहीत अपेक्षेइतक्या आयफोन्सची निर्मिती होणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.