मुंबई \ ऑनलाईन टीम
जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना ईडीकडून चौकशीचे समन्स बजावण्यात आला. त्यावेळी खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही भोसरी एमआयडीसी जमीन व्यवहार प्रकरणी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र मंदाकिनी यांनी अंमलबजावणी संचलनालयाकडे वेळ वाढवून मागितली आहे, अशी माहिती समोर येत आहे.
एकनाथ खडसेंच्या चौकशीच्या पूर्वी म्हणजेच ७ जुलै रोजी मंदाकिनी यांना हजर राहण्याचे आदेश होते. मात्र त्यांनी निवेदन देऊन १४ दिवसांची वेळ मागितली आहे. परंतु ईडीने त्यांना अजून कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचे सांगितले जात आहे.
ईडीने आज गुरुवार ८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. एकनाथ खडसे ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते. तब्बल ९ तासाच्या चौकशीनंतर ईडी कार्यलायतून एकनाथ खडसे बाहेर पडले. पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन व्यवहार प्रकरणी जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर खडसेंची चौकशी करण्यात आली.
Trending
- बियाणांचे वितरण-पूर नियंत्रणासाठी सज्ज रहा!
- संगोळ्ळी रायण्णांच्या पुतळ्यासमोर जागतिक पर्यावरण दिनाचे फलक
- प्रभूनगर येथील नागरिकांचे ठिय्या आंदोलन
- रिंगरोडच्या नोटिसीचा धक्का अन् अर्धांगवायुचा झटका
- यंदाच्या हंगामात काळ्या भाताची लागवड
- बेकिनकेरे तलावाला ‘नरेगा’चा आधार
- कडोली बसवाण्णानगरजवळ भर रस्त्यावर दुर्गंधीयुक्त कचरा : नागरिक त्रस्त
- केआर शेट्टी किंग्ज संघाकडे टेनिसबॉल बीपीएल चषक