वृत्तसंस्था/ मुंबई
हाऊसिंग फायनान्स कंपनी एचडीएफसी लिमिटेडच्या कर्ज वितरणामध्ये 26 टक्क्यांची वाढ झाली आहे. सदरची वाढ ही तिसऱया तिमाहीत म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत झाली आहे. याचा प्रभाव म्हणून कंपनीचे समभागही एक वर्षाचा उच्चांक प्राप्त करीत कार्यरत राहिले आहेत. मुंबई शेअर बाजारात समभाग 3 टक्क्यांनी वधारुन 2,649 रुपयांवर पोहोचले आहेत. याच दरम्यान कंपनीचे बाजारमूल्य 4.80 लाख कोटी रुपयांवर राहिले आहे.
कंपनीने यावेळी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार चालू वर्षातील पहिल्या 9 महिन्यांच्या दरम्यान म्हणजे एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत व्यक्तिगत कर्जाचा हिस्सा हा 86 टक्क्यांचा राहिला आहे. यातून कंपनीने जवळपास 7,076 कोटी रुपयांचे कर्ज एचडीएफसी बँकेला यावेळी दिलेले आहे. या अगोदरच्या वर्षामध्ये हा कर्जाचा आकडा 4,258 कोटी रुपयांवर राहिला होता.
12 महिन्यात 16,956 कोटांची कर्ज विक्री
मागील 12 महिन्यात एचडीएफसीने 16,956 कोटीचे वैयक्तिक कर्ज विक्री केले आहे. हा आकडा मागील वर्षात 12 हजार 66 कोटी इतका होता. डिव्हीडेंडमधून कंपनीचे ग्रॉस इनकम तिसऱया तिमाहीत 2 कोटी रुपये होते. जे एक वर्षाच्या अगोदर 4 कोटी रुपये होते.
एचडीएफसी लिमिटेडच्या निव्वळ नफ्यात दुसऱया तिमाहीमध्ये 53.2 टक्क्यांची घसरण आली आहे.
कंपनीचा नफा
डिसेंबर तिमाहीमध्ये वरील गुंतवणूक विकल्याने कंपनीला जवळपास 157 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. याच दरम्यान एचडीएफसी लाईफ इन्शुरन्समध्ये आपले 2548 लाख समभाग विक्री केले आहेत.