20 लहान व्यावसायिक वाहनांची निर्यात : अन्य प्रकारच्या वाहनांची निर्यात शुन्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सध्या जगासोबत देशात सर्व ठिकाणी लॉकडाऊनची घोषणा केंद्राकडून करण्यात आली आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य उद्योगधंदे ठप्प झाल्याचे पहावयास मिळत आहे. परंतु याही कालावधीत वाहन क्षेत्रांतील विविध कंपन्यांच्या वाहन विक्रीचे आकडे शुन्यावर आले असताना मात्र फोर्स मोटर्सकडून मात्र एप्रिलमध्ये 66 वाहनांची विक्री करण्यात आली. अशोक लेलँडने एकही वाहन विकले नसल्याची नोंद करण्यात आली
आहे.
फोर्सची लहान व्यावसायिक वाहने आणि हलक्मया व्यावसायिक वाहनांची देशातील विक्री एप्रिलमध्ये शून्य राहिली आहे. परंतु याचदरम्यान स्पोर्ट्स युटिलिटी, युटिलिटी आणि ट्रक्टरच्या प्रकारातील एकूण 46 वाहनांची देशात विक्री झाली आहे. याच कालावधीत 20 लहान व्यावसायिक वाहने व हलक्मया व्यावसायिक वाहनांची निर्यात करण्यात आली आहे. अन्य प्रकारच्या वाहनांची निर्यात यावेळी शुन्य झाल्याची नोंद करण्यात आली.
फोर्सकडून उत्पादन सुरु
देशातील प्रमुख वाहन कंपनी भारत फोर्सने लॉकडाऊनच्या कालावधीत बंद ठेवण्यात आलेला बारामतीमधील वाहनांचा पार्ट्स तयार करणारा प्रकल्प पुन्हा नव्याने सुरु केला असल्याची माहिती संबंधीत अधिकाऱयांनी दिली आहे. तसेच या महिन्यातील शेवटच्या आठवडय़ात कारखान्यांमधील उत्पादनास प्रारंभ करण्यात येणार असल्याचा अंदाज कंपनीने व्यक्त केला आहे.
अशोक लेलँडची स्थिती व्यावसायिक वाहनांची निर्मिती करणारी प्रमुख कंपनी अशोक लेलँडची एप्रिल महिन्यातील विक्री शुन्यावर राहिली आहे. मागील वर्षातील याच महिन्यातील वाहनांची देशातील आणि निर्यात बाजारात 13,626 वाहनांची विक्री झाली आहे. तसेच अशोक लेलँडकडून कोविड 19च्या संकटात भारत सरकारने दिलेल्या सर्व नियमावलीचे पालन करत उत्पादन सुरु करण्याची तयारी करणार आहे. परंतु राज्य सरकारच्या परवानगी नंतरच हा निर्णय घेतला जाणार असल्याचे यावेळी स्पष्टीकरण दिले आहे.