वारणानगर / प्रतिनिधी
गेल्या वर्षीचा गळीत हंगाम संपून चालू वर्षीचा ऊसाचा गळीत हंगाम सुरू होण्याची वेळ आली आहे तरी सुध्दा वारणा साखर कारखान्याने थकीत एफआरपीची रक्कम अद्याप दिलेली नाही. सदरची रक्कम तातडीने द्यावी अन्यथा दि.१५ आक्टोंबरला शेतकरी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी वारणा कारखान्यास निवेदनाद्वारे दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने वारणा कारखान्याचे सचिव बी.बी.दोशिंगे यांच्याकडे निवेदन दिले.
महाराष्ट्र शुगर केन अॅक्टनुसार शेतकऱ्यांचा ऊस साखर कारखान्याला गेल्यापासून १४ दिवसाचे आत शेतकऱ्यांचे एफआरपी नुसार पैसे देणे बंधनकारक आहे. गळीत हंगाम संपून सहा महिने झाले ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीनुसार सर्व रक्कम दिलेली नाही. सध्या कोवीड या महामारीमुळे सर्वच त्रस्त आहेत. शेतकरी कष्टकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आहेत. याचा विचार करून शेतकऱ्यांची थकीत एफआरपीची रक्कम देण्यात यावी अशी मागणी वैभव कांबळे यांनी केली.या शिष्ठमंडळात संपतराव पोवार ( पारगाव), सुधीर मगदूम,दिपक सनदे (घुणकी), मानसिंग मोहीते, सदाशिव बोने – पाटील, दिपक सनदे, शिवाजी आंबेकर, अक्षय कांबळे(पारगाव) आदी उपस्थित होते.
Previous Articleअमेरिकन कवयित्री लुईस ग्लुक यांना साहित्य नोबेल पुरस्कार जाहीर
Next Article महिला कुस्तीगिरांच्या खुराकासाठी खा.कोल्हे धावले
Related Posts
Add A Comment