ऍमेझॉन प्राईम व्हिडिओने निर्माता अक्षय बर्दापूरकरसोबत सहयोगाने महाराष्ट्र दिनी नुकताच प्रदर्शित झालेला विनोदी चित्रपट एबी आणि सीडीचे डिजिटल प्रिमिअर सादर केले जाणार असल्याची घोषणा केली. एबी आणि सीडी या चित्रपटामध्ये सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासह दिग्गज मराठी अभिनेते विक्रम गोखले आहेत. एबी आणि सीडी हा देशव्यापी लॉकडाऊनमुळे चित्रपटागफहामध्ये प्रदर्शित न होऊ शकलेल्या काही चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपट महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे 2020 रोजी डिजिटल पदार्पण करण्यास सज्ज आहे. हा चित्रपट सध्याच्या कठीण काळामध्ये कोविड-19 विरोधात लढणाऱया योद्धांना मानवंदना देणार आहे. मिलिंद लेले यांनी एबी आणि सीडी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
निर्माता अक्षय बर्दापूरकर म्हणाले, सद्यस्थितीमध्ये लोकांची सुरक्षितता आणि आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच आमचे स्ट्रिमिंग भागीदार ऍमेझॉन प्राईम व्हिडिओसह या सुरेख चित्रपटाचे डिजिटली पदार्पण करण्याचे ठरवण्यात आले. प्राईम व्हिडिओसोबत आम्हाला कोविडविरोधातील लढय़ामध्ये अग्रणी असलेल्या सर्व हिरोंना मानवंदना म्हणून महाराष्ट्र दिनी, म्हणजेच कामगार दिनी हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा आनंद होत आहे. दीर्घकाळापर्यंत स्मरणात राहणाऱया या अथक प्रयत्नांना आमची ही एक विनम्र मानवंदना आहे. प्राईम व्हिडिओ विभागामधील हजारो टीव्ही कार्यक्रम आणि हॉलिवूड आणि बॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये एबी आणि सीडी या चित्रपटाची भर होईल. या विभागामध्ये ऍमेझॉन ओरिजिनल सिरीज दि पॅमिली मॅन, मिर्झापूर, इनसाईड एज आणि मेड इन हेव्हन यांचा समावेश आहे. या सेवेमध्ये हिंदी, मराठी, गुजराती, तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, पंजाबी व बंगाली या भाषांतील चित्रपट आणि कार्यक्रमांचा समावेश आहे.