नवी दिल्ली
एमआय 10 आय हा 108 मेगा पिक्सलचा दमदार मोबाईल मंगळवार 5 जानेवारीला भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचे समजते. एमआय 10 आय हेच नव्या फोनचे नाव असेल म्हणून सांगता येत नाही. कदाचित दुसरंही नाव असू शकतं. भारतात दाखल होणारा नवा स्मार्टफोन नोट 9 प्रो 5 जी या फोनचीच नवी आवृत्ती असेल असे म्हटले जात आहे. 108 मेगापिक्सलचा हा फोन चीनमध्ये यापूर्वी लाँच केला होता. नव्या फोनला 6.67 इंचाच्या डिस्प्ले, 6 जीबी रॅमसह स्नॅपड्रगन 750 जी प्रोसेसर असणार आहे. 4 हजार 820 एमएएचची बॅटरी या फोनला असेल.