जिल्हय़ात खळबळ, 6 शिक्षकांनाही लागण होण्याची भिती
प्रतिनिधी/ बेळगाव
एम. तिम्मापूर (ता. रामदुर्ग) येथील 22 शाळकरी मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. एकीकडे शाळा, कॉलेज सुरू करावे की नाही? या विषयावर चर्चा सुरू असतानाच शाळकरी मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे.
उपलब्ध माहितीनुसार सर्व 22 विद्यार्थ्यांवर त्यांच्या त्यांच्या घरीच उपचार करण्यात येत आहेत. कारण कोणालाही कोरोनाची लक्षणे आढळून आली नाहीत. 4 ऑक्टोबर रोजी त्यांची तपासणी करण्यात आली होती. विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ माजली आहे.
विद्यागम योजनेंतर्गत सात ते आठ विद्यार्थ्यांना सरकारी नियमानुसार शिक्षण देण्याची व्यवस्था सर्वत्र सुरू करण्यात आली आहे. एम. तिम्मापूर येथील सरकारी प्राथमिक शाळेत 190 हून अधिक विद्यार्थी आहेत. यापैकी 22 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.
या विद्यार्थ्यांना शिकवणाऱया सहा शिक्षकांनाही कोरोनाची भिती आहे. या संबंधी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ यांच्याशी संपर्क साधला असता 4 ऑक्टोबर रोजी त्या गावातील 117 जणांचे स्वॅब जमविण्यात आले होते. यापैकी 21 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ते 9 ते 50 वयोगटातील असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र शाळा सुधारणा समितीच्या अध्यक्षांनी रामदुर्गच्या गटशिक्षणाधिकाऱयांना पाठविलेले पत्र तरुण भारतला उपलब्ध झाले आहे. या पत्रातील माहितीनुसार 22 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमिवर विद्यागम योजनेंतर्गत दिले जाणारे शिक्षण थांबविण्याची विनंती शिक्षणाधिकाऱयांना करण्यात आली आहे.
तालुक्यात अकरा रुग्ण कोरोनामुक्त
तालुक्यात आज शुक्रवारी दोघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 579 झाली आहे. आज अकरा रुग्ण बरे होऊन घरी परतले असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 451 झाली आहे. आज तालुक्मयातील हणमसागर व गोण्णागर येथून दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून यात एक पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. एकूण 94 रुग्णांवर उपचार सुरू असून यात 87 रुग्णांवर घरी उपचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.