बेळगाव स्पोर्ट्स क्लबला उपविजेतेपद : नितीन बिल्ले सामनावीर, स्वप्निल एळवेची अष्टपैलू कामगिरी वाया

क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
भेदक गोलंदाजी व नितीन बिल्लेची समयोचित फलंदाजी यांच्या जोरावर एसडीएम ए धारवाड संघाने बेळगाव स्पोर्ट्स अ संघाचा चुरशीच्या लढतीत केवळ एका गडय़ाने मात करून धारवाड झोन फर्स्ट डिव्हीजन चषक पटकाविला. 86 धावा करणाऱया नितीन बिल्लेला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
ऑटोनगर येथील केएससीए बेळगाव मैदानावर आयोजित धारवाड झोन फर्स्ट डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बेळगाव स्पोर्टस् क्लब अ संघाने 49.4 षटकात सर्व बाद 231 धावा केल्या. स्वप्नील एळवेने 1 षटकार, 6 चौकारासह 71, ओंकार वेर्णेकरने 52, अमर घाळीने 39, आकाश कटांबळेने 26, शिवम नेसरीकरने 13 तर विजयकुमार पाटीलने 11 धावा केल्या. एसडीएम ए संघातर्फे अजिम गट्टण्णावरने 22 धावात 2, अनुमंत मांगी व राजु कलाल यांनी प्रत्येकी 49 धावात 2, परिक्षित उकुंडीने 45 धावात 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना एसडीएम ए धारवाड संघाने 49 षटकात 9 बाद 233 धावा करून सामना एका गडय़ाने जिंकून फर्स्ट डिव्हीजन स्पर्धेचे अजिंक्मयपद पटकाविले. नितीन बिल्लेने 1 षटकार, 18 चौकारासह 86, अजय पाटीलने 36, अजिम गट्टण्णावरने 38, इंद्रसेन दानीने 19, बसवराज देमकण्णवरने 15 तर आदित्य हिरेमठने नाबाद 14 धावा केल्या.
बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे स्वप्निल एळवेने 53 धावात 4, आकाश कटांबळेने 26 धावात 2, स्वयम अप्पण्णावर, ओंकार वेर्णेकर व शुभम गौंडाडकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.