नवी दिल्ली
कृषी उपकरणे तयार करणारी कंपनी एस्कॉर्ट ऍग्री मशीनरी टॅक्टर्सची विक्री ऑगस्टमध्ये 80.1 टक्क्मयांनी वाढून 7,268 वर पोहोचली आहे. ऑगस्ट 2019 मध्ये कंपनीने 4,035 ट्रक्टर्सची विक्री केली होती. यंदा समाधानकारक मान्सूनमुळे खरीप पिकाचे उत्पादन योग्य प्रमाणात राहणार असून यामुळे बाजाराची स्थिती मजबूत होण्यास मदत होणार असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. यामुळे शेतीशी संबंधीत उपकरणांची विक्री जोमाने वाढत असल्याची नोंद शेती उपकरणे तयार करणाऱया कंपन्यांनी केली आहे. देशातील बाजारात टॅक्टर विक्री ही 79.4 टक्क्मयांनी वाढून 6,750 वर पोहोचली आहे. ज्यामध्ये मागील वर्षाची तुलना केल्यास हा आकडा 3,763 इतकाच असल्याची माहिती आहे. कंपनीची निर्यात ही 90.4 टक्क्मयांनी वाढून 272 ते 518 वर राहिलेली आहे.