वार्ताहर/ निपाणी
हस्तशास्त्रद्वारे अचूक भाग्यरत्न परंपरा दिवंगत रत्नशास्त्री एच. ए. मोतीवाला यांच्या आदर्शातून सहाव्या पिढीचे यशस्वी नेतृत्व करणारे निपाणीचे ए. एच. मोतीवाला यांची सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत महाराष्ट्र जर्नालिस्ट फाऊंडेशनने नुकताच दि प्राईड ऑफ महाराष्ट्र आदर्श रत्नशास्त्री हा पुरस्कार जाहीर केला. या पुरस्काराचे वितरण 13 रोजी वेणूताई चव्हाण स्मारक नाटय़गृह-कराड येथे दुपारी 4 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
ए. एच. मोतीवाला यांना हा पुरस्कार मिळाल्याने निपाणीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सन्मान चिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. वितरण सोहळय़ाला खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री सदाभाऊ खोत, आण्णासाहेब डांगे, साईकिरण बाबाजी, नगराध्यक्ष रोहिणी पाटील, हरिष घाटगे, अशोक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.