ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राजेनेकाकडून विकसित करण्यात आलेली कोविशिल्ड लस लवकरच समीक्षेसाठी तयार होणार आहे. युरोपीय नियामक 1-2 आठवडय़ात या लसीचा एक्सलेरेटेड रिह्यू सुरू करू शकतात.
युरोपमध्ये नियामकीय मंजुरी प्राप्त करणारी कोविशिल्ड पहिली लस ठरू शकते. युरोपीय मेडिसीन एजेन्सी 1-2 आठवडय़ात याचा रोलिंग रिह्यू सुरू करू शकते. अशाप्रकारच्या असेसमेंट आपत्कालीन स्थितीत होत असतात. विशेषकरून कोविड-19 महामारीचा प्रकोप पाहता तातडीची मान्यता आवश्यक ठरली आहे. समीक्षा झाल्यावर लवकरात लवकर कोविशिल्ड नियामकीय मान्यता मिळेल, असे चित्र निर्माण झाले आहे.
कोविशिल्डची तिसऱया टप्प्यातील चाचणी 6 सप्टेंबर रोजी ब्रिटनमध्ये थांबविण्यात आली होती. एका स्वयंसेवकाची प्रकृती बिघडल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. परंतु सुरक्षा चाचणीनंतर 12 सप्टेंबर रोजी ब्रिटनमध्ये याच्या चाचण्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. ब्रिटन, ब्राझील, भारत आणि दक्षिण आफ्रिकेतही या लसीची चाचणी सुरू आहे.