वाळपई / प्रतिनिधी
गोव्यामध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून निर्माण होणाऱया अनेक कटकटी व समस्या या संदर्भाच्या तक्रारी शिक्षण खात्याकडे पोचून सुद्धा शिक्षण खात्याने यासंदर्भात कोणत्याही प्रकारचा पर्याय उपलब्ध केलेला नाही. यामुळे सत्तरी सारख्या ग्रामीण भागांमध्ये आजही मोठय़ा प्रमाणात मुलांना ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा लाभ घेण्यासाठी कठीण समस्यांना सामोरे जावे लागत आहे .सत्तरी तालुक्मयाच्या अनेक गावांमध्ये आजही मोबाईल नेटवर्कची सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे मुलांसमोर अडचण निर्माण झालेली आहे. यामुळे अनेक भयंकर समस्यांना तोंड देत मुलांना घरापासून कित्येक किलोमीटर अंतरावर जाऊन ऑनलाईन पद्धतीच्या शिक्षणाकडे आपले सूत्र जुळवून घ्यावे लागत आहे .अशाच प्रकारचा एक विदारक चित्र सत्तरी तालुक्मयातील सुर्ला गावातील मुलांच्या संदर्भात आलेला आहे.

घनदाट जंगलामध्ये भर पावसात अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड देत मुले मुळे तासनतास रानामध्ये जाऊन ऑनलाइन पद्धतीचा शिक्षण सुविधेचा लाभ घेत असल्याचे समोर आलेली आहे. याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुक्मयाच्या अनेक ग्रामीण भागांमध्ये नेटवर्कची सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे ग्रामीण भागातील मुलांना ऑनलाइन पद्धतीचे शिक्षण सुविधा लाभ घेण्यासाठी कटकटी सहन कराव्या लागत आहे. यामुळे अनेकवार ग्रामीण भागातील पालकांनी ऑनलाइन पद्धत बंद करावी किंवा सरकारने ज्या ठिकाणी नेटवर्कची सुविधा उपलब्ध होत नाही सदर ठिकाणी उपाययोजना करण्याची मागणी पालकांनी व ग्रामीण भागातील नागरिकांनी वारंवारपणे केली. मात्र अजूनपर्यंत सरकारने याची अजिबात दखल घेतलेली नाही. सध्यातरी सुर्ला भागातील मुलांना अशा गंभीर स्वरूपाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
सुर्ला गावांमध्ये मोबाईलचा टाँँवर नाही. यामुळे सदर भागांमध्ये कोणत्याही प्रकारचे नेटवर्क सुविधा उपलब्ध होत नाही. सरकारने सदर गावामध्ये माध्यमिक शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे .यासाठी खास इमारतीची उभारणी केलेली आहे. मात्र या गावांमध्ये मोबाईल नेटवर्कची सुविधा उपलब्ध नाही. सरकारने ऑनलाइन पद्धतीची शिक्षण प्रक्रिया सुरू करण्यात आल्यानंतर त्याचे गंभीर परिणाम यागावातील मुलावर होऊ लागलेले आहेत .गेल्या काही दिवसापासून याभागातील मुले गावापासून जवळपास तीन किलोमीटर अंतरावर चालत जाऊन घनदाट जंगलामध्ये बसून या सुविधेचा लाभ घेताना दिसत आहेत.

एका बाजूने मोठय़ा प्रमाणात लागणारा पाऊस दुसऱया बाजूने ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या सुविधांपासून नुकसान होऊ नये म्हणून ही मुले तासांतच रानामध्ये बसून या सुविधेचा लाभ घेताना दिसत आहेत. जवळपास 15 पेक्षा जास्त मुले दररोज अशाप्रकारे स्वतः व्यवस्था करून त्याचा लाभ घेताना दिसत आहेत. आज दिवसभर यासंदर्भाचे फोटो फेसबुक व सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रकारच्या तिखट प्रतिक्रिया भरभरून येऊ लागलेल्या आहेत .सदर फोटोतील चित्र म्हणजे खरोखरच आपण विकसित गोव्यामध्ये रहातो का अशा प्रकारचा सवाल निर्माण करणारे आहेत.
गोवा मुक्त होऊन जवळपास साठ वर्षे पूर्ण होत आली मात्र ग्रामीण भागांमध्ये अजूनही नेटवर्कची सुविधा उपलब्ध होत नाही ही खरोखरच खेदाची बाब असल्याच्या प्रतिक्रिया जागरूक नागरिकांकडून व्यक्त होताना दिसत आहेत. यागावांमध्ये मोबाईल टाँवर उभारण्यासंदर्भात अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र त्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद सरकारकडून उपलब्ध झालेला नाही .यामुळे सुर्ला गाव जरी गोव्यामध्ये समाविष्ट असला तरीसुद्धा यागावाचा अनेक दृष्टिकोनातून संपर्क सध्यातरी तुटलेल्यात जमा आहे.