मागील दोन वर्षे दिवाळीचा सण धूमधडाक्मयात साजरा करता आला नाही. कारण कोविड-19 ने माजवलेला धुमाकूळ. ह्या वषी मात्र कोविड-19 आटोक्मयात आला आहे. लोकदेखील बाहेर पडले आहेत. त्यामुळे ह्या वषीची दिवाळी मात्र धुमधडाक्मयात साजरी होणार हे निश्चित. दोन वर्षानंतर दिवाळी मोठय़ा प्रमाणात साजरी करता येणार म्हणून लोकांनी आणि व्यापारी वर्गानेही मोठय़ा जोमाने तयारी केली आहे. विविध दिवाळी ऑफर्स दिल्या जात आहेत.
अशा परिस्थितीमध्ये सायबर गुन्हेगार कसे मागे राहतील. तेही दिवाळीमध्ये आपले हात साफ करुन घेणार हे निश्चितच. त्यामुळे यंदा बंपर शॉपिंग होणार आहे. विविध प्रकारच्या वस्तू ऑनलाइन खरेदी करण्याचा मोह टाळता न येण्यासारखा आहे. त्यामुळे जर तुम्हीही या शुभ मुहूर्तावर काही खरेदी करणार असाल तर व्यवहाराची काळजी घेणे आवश्यक आहे. काही गोष्टींची काळजी न घेतल्यास ऑनलाइन फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे.
दिवाळीच्या विविध दिवसानिमित्ताने मोठय़ा ई-कॉमर्स वेबसाइट्स बंपर ऑफर्स घेऊन येतात. यामध्ये काही अनोळखी वेबसाईटस्ही असतात. त्यामुळे ऑनलाइन वस्तू खरेदी करताना कोणती वेबसाईट खरी आहे खोटी आहे हे तपासणे आवश्यक आहे. अनेक सायबर लुटारुंचे डोळे तुमच्यावर आहेत. व्यवहार करताना प्रत्येक टप्प्यावर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्हीही ऑनलाइन फसवणुकीचे बळी होऊ शकता.
अनेक वेळा अशा फिशिंग लिंक्स आपल्या फोनवर येतात, ज्यामध्ये महागडय़ा वस्तू अगदी कमी किमतीत दाखवल्या जातात. अशा स्थितीत अनेकांना मोह होऊन त्यांच्यावर क्लिक केले जाते. पैशाचा व्यवहार होतो, फसवले जातो ज्यामुळे खूप त्रास सहन करावा लागतो. तुम्ही या फिशिंग लिंकवर कधीही क्लिक करू नका. या लिंकद्वारे आलेल्या ऑफर्स खऱया आहेत का हे तपासून पाहणे आवश्यक आहे.
कोणतीही वेबसाईट लिंक ओपन करण्यापूर्वी हे लक्षात घ्यावे की वेबसाइटच्या सुरुवातीला https:// असे आहे का. दुसरीकडे, जर वेबसाइटच्या सुरुवातीला नुसते http:// लिहिले असेल तर त्यावर अजिबात क्लिक करू नका. नेहमी विश्वसनीय ई-कॉमर्स वेबसाइटवरून खरेदी करा. ऑनलाइन खरेदी करताना अँटी व्हायरस फायरवॉल, मोबाईलची सिक्मयुरीटी नेहमी चालू ठेवा. shoppiie.com, white-stones.in, jollyfashion.in, fabricmaniaa.com takesaree.com, assuredkart.in, republicsaleoffers.myshopify.com fabricwibes.com, efinancetix.com, thefabricshome.com, thermoclassic.site, kasmira.in या व अशा अनेक वेबसाईट्स ज्याद्वारे फसले जाऊ शकतो. मुंबई पोलीसांच्या सायबर सेल विभागाने ह्यांचा छडा लावला आहे.
कोणतीही महत्त्वाची माहिती कोणालाही ऑनलाइन देऊ नका. तुमचा पासवर्ड वेळोवेळी बदला जेणेकरून तुम्हाला भविष्यात कोणतीही अडचण येऊ नये. तुमच्या डेबिट, पेडिट कार्ड, UPI पेमेंट इत्यादींशी संबंधित कोणतीही माहिती कोणालाही देऊ नका. तुमच्या डिव्हाइसवर फिशिंग लिंक उघडणे टाळा. या गोष्टी लक्षात ठेवल्या तर सायबर फसवणूक टाळता येईल.
ऑनलाईन खरेदी करतानाच्या महत्वाच्या टिप्स-
आपल्या ब्राउझरमध्ये कोणतेही अनट्रस्टेड ऍप / प्लगइन / ऍड-ऑन नाहीत याची खात्री करा.
अधिकृत स्टोअर / वेबसाइटवरून ऍप्स डाऊनलोड करा.
कोणतेही ऍप्स डाऊनलोड करण्यापूर्वी “टर्म-कंडीशन्स’’ तपासा, अनावश्यक परवानग्या विचारत असलेले ऍप्स वापरू नका.
मोबाईल ऍपची वैधता / विश्वासार्हता तपासा.
जर कोणीही आपल्याला टीमव्यूअर किंवा एनीडेस्क यासारखे रिमोट ऍक्सेस सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगत असेल तर असे ऍप्स डाऊनलोड करू नका, असे केल्याने आपली फसवणूक होऊ शकते. ती व्यक्ती आपल्या फोनचा ताबा घेऊन हवे ते व्यवहार करु शकते.
व्यवहार पूर्ण झाल्यावर ईकॉमर्स, वॉलेट आणि बँकिंग ऍप्समधून लॉग आउट करा.
क्मयूआर कोडद्वारे व्यवहार केल्यास, विनंतीचे प्रकार तपासा. व्यवहाराची विनंती स्वीकारताना फ्रॉडस्टर हा निधी वळवू शकतात.
आपल्या कार्डाचा तपशील कोणत्याही ईकॉमर्स ऍपमध्ये सेव्ह करु नका.
आर्थिक व्यवहारासाठी कोणतीही सार्वजनिक / विनामूल्य वाय-फाय वापरू नका.
आपल्या आर्थिक व्यवहाराच्या बँकेच्या स्टेटमेंट पहा.
ऑनलाईन खरेदी करताना डेबिट / पेडीट कार्डच्या संदर्भातील सुरक्षापण तितकीच महत्वाची आहे. प्रत्येक व्यवहाराच्या वेळी ही काळजी घेणे आवश्यक आहे. मग ही काळजी कोणती तर आपल्या कार्डचे पिन अंदाज लावण्यायोग्य न ठेवणे, आपले डेबिट/पेडिट कार्ड तपशील, कार्ड क्रमांक, पिन, ओटीप़ी कोणासही सांगू अथवा देऊ नये, तसेच पिन नियमित काळाने बदलत राहाणे. जर आपल्याकडे दोन तीन कार्डे असल्यास, सर्व कार्डांना समान पिन न ठेवणे, कार्ड क्रमांक आणि पिन टाईप करताना नेहमी आपला हात झाकून टाईप करणे, अशी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.
काळजी घेऊनही जर आपली फसवणूक झाली तर सायबर क्राइम सेल / सायबर पोलिस ठाण्याशी त्वरित संपर्क साधा. तुमचे कार्ड ज्या बँकेचे आहेत तेथे त्वरीत संपर्क करुन कार्ड ब्लॉक करुन पुढील व्यवहार थांबवा. ई-कॉमर्स वेबसाइटच्या कंझ्युमर सेलला फोन अथवा मेल करुन त्यांना व्यवहार थांबवण्याची रिक्वेस्ट टाका. तुमच्या कार्डाचा / खात्याचा पासवर्ड किंवा पिन क्रमांक बदला.
म्हणून आपणास कोणत्याही सणाला ऑनलाईन शॉपिंग करणार असाल तर काळजीपूर्वक करा. सर्व व्यवहार तपासून पहा, मोबाईल फोन गहाळ, हरवणार नाही याची काळजी घ्या.
-विनायक राजाध्यक्ष