नवी दिल्ली
ओकाया या कंपनीने आपल्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर्स ‘फ्रीडम’ शेणीअंतर्गत नुकत्याच बाजारात लाँच केल्या आहेत. सदरच्या स्कूटरची सुरूवातीची किंमत 70 हजार रुपये इतकी असणार असून 12 रंगांचा पर्याय असणार आहे. पूर्णपणे भारतात तयार केलेली ही स्कूटर असणार असून एका सिंगल चार्जवर गाडी 70 ते 80 किमीचे अंतर कापणार आहे. सदरच्या बॅटरी चार्जकरता 4 ते 5 तासाचा अवधी लागणार आहे. फ्रीडम एलआय-2 व फ्रीडम एलए- 2 या गाडय़ा ओकायाने बाजारात दाखल केल्या आहेत.