ओटवणेत रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद
ओटवणे / प्रतिनिधी:
ओटवणे चॅरीटेबल ग्रुप आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सावंतवाडी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ओटवणे कुळघर येथे दादा स्मृती रंगमंचावर आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सल्लागार तथा सेवानिवृत्त डीवायएसपी दयानंद गवस, ओटवणे सरपंच सौ उत्कर्षा गावकर, माजी सरपंच रविंद्र म्हापसेकर, गावठणवाडी मंडळाचे अध्यक्ष उमेश गावकर, ओटवणे चॅरीटेबल ग्रुपचे अध्यक्ष तथा गावप्रमुख रविंद्रनाथ गांवकर, सचिव जयगणेश गांवकर, खजिनदार शेखर गांवकर, युवा कार्यकर्ते हरिहर मयेकर, सावंतवाडी रक्तपेढीच्या डाॅ. मसुरकर, श्रीम. बागेवाडी, श्रीम. रेडकर, अनिल खाडे, सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानचे सावंतवाडी सहसचिव अनिकेत सावंत, सहखजिनदार सिद्धार्थ पराडकर, अँड संदिप चांदेकर, सचिव बाबली गवंडे आदी उपस्थित होते.
यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सावंतवाडी तालुका सचिव बाबली गवंडे यांनी संस्थेने जिल्हा, राज्य आणि राज्याबाहेरही रक्तदान क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा घेतला. गेल्या वर्षभरात स्थानिक सेवाभावी मंडळांच्या सहकार्याने संस्थेने शंभरहून अधिक शिबिरे आयोजित करुन अडीच हजार पेक्षा जास्त रक्तदात्यांकरवी रक्तदान करुन घेतल्याचे सांगितले. याप्रसंगी सावंतवाडी रक्तपेढी, ओरोस रक्तपेढी, एसएसपीएम्, पडवे रक्तपेढी आणि जीवनधारा रक्तपेढी, कोल्हापूर यांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सिंधुरक्तमित्रांच्या हाकेला ओ देऊन तात्काळ रक्तदान करणार्या रक्तवीरांचे आभार मानले.
यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सल्लागार तथा निवृत्त डीवायएसपी दयानंद गवस यांनी गावकर्यांशी संवाद साधताना रक्तदान, अवयवदान, देहदान याविषयी विस्तृत माहिती दिली. तसेच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित केल्याबद्दल ओटवणे चॅरीटेबल ग्रुपचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओटवणे चॅरीटेबल ग्रुपचे सचिव जयगणेश गांवकर तर आभार खजिनदार शेखर गांवकर यांनी मानले.