कोरोना संसर्गाचा चित्रपटसृष्टी ला अतोनात फटका बसला आहे. चित्रपटगफह बंद असल्याने तयार चित्रपटही पडून आहेत. त्यामुळे ओटीटी माध्यमाद्वारे प्रदर्शित होणार्या चित्रपटांनाही शासनाचे अनुदान मिळण्याची मागणी ष्प्लॅनेट मराठीष्चे संचालक अक्षय बर्दापूरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी अक्षय बर्दापूरकर यांनी पुढाकार घेऊन प्लॅनेट मराठी ओटीटी या स्वतंत्र ओटीटी प्लॅटफॉर्मची निर्मिती केली आहे. मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाची अनुदान योजना आहे. मात्र या अनुदान योजनेत चित्रपट चित्रपटगफहांमध्येच प्रदर्शित करण्याची अट आहे. कोरोना संसर्गाच्या काळात चित्रपटगफह बंद ठेवण्यात आल्याने चित्रपट प्रदर्शित करता आलेले नाही. निर्मात्यांनी चित्रपट चित्रपटगफहात प्रदर्शित करण्यापूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित केल्यास त्यांना शासनाच्या अनुदान योजनेला मुकावे लागेल. त्यामुळे निर्मात्यांचे नुकसान होऊ शकते. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेऊन खास बाब म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱया चित्रपटांनाही अनुदान योजनेसाठी ग्राह्य धरण्यात यावे, अशी मागणी बर्दापूरकर यांनी केली आहे. फुलाला सुगंध