वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्मार्टफोन पुननिर्मिती करणारी कंपनी ओप्पो भारतात आपली पहिली 5-जी नेटवर्कची इनोव्हेशन प्रयोगशाळा स्थापन करणार असल्याची माहिती कंपनीने मंगळवारी दिली आहे. सदर प्रयोगशाळेचे केंद्र हे हैदराबाद येथे उभारण्यात येणार असल्याची माहिती आहे. चीनच्या बाहेर अशा प्रकारची कंपनी प्रथम ओप्पो स्थापन करणार असल्याची माहिती आहे. कंपनी हैदराबाद येथील संशोधन आणि विकास केंद्रात कॅमेरा, पॉवर आणि बॅटरी तसेच इतर क्षेत्रासाठी आणखीन तीन प्रयोगशाळा उभारणार आहे, असेही समजते. विदेशात कार्यरत असणारी ओप्पो कंपनी प्रथमच देशात 5-जी प्रयोगशाळेची स्थापना करणार असून अशा प्रकल्पाचे भारत समर्थन करणार असल्याचे ओप्पो इंडियाचे उपाध्यक्ष आणि शोध विकास विभागाचे प्रमुख तसलीम आरिफ यांनी यावेळी म्हटले आहे.