ऑनलाईन टीम / मुंबई :
ओबीसी आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण लागू होण्यासाठी राज्य सरकारने याबाबतचे विधेयक आज विधानसभेत मांडले. मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र नगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आलं आहे.
हे विधेयक विधानसभेत मंजूर झाल्याने ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको, यासाठी निवडणूक प्रक्रिया, प्रभाग रचना, निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे अधिकार राज्य सरकारने आपल्याकडे ठेवले आहेत.