प्रतिनिधी/ बेळगाव
एनसीसीच्या 26 कर्नाटक बटालियनतर्फे एनसीसी ज्युनियर अंडर ऑफिसर ओमकार भाऊराव पाटील यांना मुख्यमंत्री प्रशंसा प्रमाणपत्र व सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. बेळगाव एनसीसी हेडक्वॉर्टर्स येथे झालेल्या कार्यक्रमात कमांडिंग ऑफिसर कर्नल राजीव खजोरिया यांच्या हस्ते पदक देण्यात आले.
ओमकार पाटील हे मागील 3 वर्षांपासून एनसीसी प्रशिक्षण घेत आहेत. थल सेना कॅम्प, आरडीसी कॅम्पसह अनेक कॅम्प त्यांनी पूर्ण केले आहेत. या प्रशिक्षणादरम्यान त्यांनी केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांची मुख्यमंत्री प्रशंसा प्रमाणपत्रासाठी निवड करण्यात आली होती. यावेळी बटालियनचे ऍडम कमांडर कर्नल ए. के. वर्मा, कमांडिंग ऑफिसर, ऍडम ऑफिसर सुभेदार मेजर, जीएसएस महाविद्यालयाचे प्राचार्य, ए. एन. ओ. व त्यांचे वडील ऑर्डिनरी कॅप्टन भाऊराव पाटील यांचे मार्गदर्शन त्यांना मिळत आहे.