वार्ताहर/ कंग्राळी बुद्रुक
‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ अशा भक्तिमय वातावरणात कंग्राळी बुद्रुक गौंडवाड, यमनापूर, शाहूनगर परिसरामध्ये शुक्रवारी घरगुती गणेशमूर्तींचे ढोल-ताशांच्या गजरात तर फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले.
शुक्रवारी सकाळपासूनच परिसरामध्ये गणेशमूर्ती आणण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत होते. घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केल्यानंतर सकाळी 9 पासून ते 5 वाजेपर्यंत घरगुती गणपतींची पूजा सुरू असलेले चित्र दिसून येत होते.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीने हाहाकार माजवून सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलडूमन टाकले आहे. कोरोना महामारीमुळे अनेकांचे संसार उघडय़ावर पडले. तेव्हा यापुढे असे न होण्यासाठी आपला गाव, देश सुदृढ बनविण्यासाठी गणराया तूच या कोरोना महामारीला आवर घाल व सर्वसामान्यांना सुखा-समाधानाने राहण्याची शक्ती दे, असे साकडे घालण्यात आले.
