स्नायूंचा अतिरिक्त वापर-ताण, दुखापतीमुळे होतो त्रास : योग्य व्यायाम-औषधांद्वारे दुखणे आटोक्मयात आणणे शक्य

अलीकडे कंबरदुखी, संधीवात आजार वाढत आहेत. त्याबाबत आपल्याला लवकरात लवकर विचार करणे भाग आहे. नुकत्याच झालेल्या स्पाईन डे निमित्त…
कंबरदुखी हा एक स्नायू व हाडांचा एकत्रित आजार आहे. यात बरगडय़ांच्या खालच्या आणि पायांच्या वरच्या भागावर परिणाम होतो. स्नायूंचा अतिरिक्त वापर किंवा त्यावर ताण येणे किंवा दुखापतीमुळे हा त्रास होतो. जवळपास प्रत्येकालाच आयुष्यात कधी ना कधी कंबरदुखीचा त्रास होतोच. हे दुखणे पाठीचा कणा, स्नायू, मज्जारज्जू किंवा पाठीच्या मधल्या किंवा वरच्या भागात पसरत जाते. जांघेत हर्निया झाल्याने किंवा वृषण किंवा अंडकोशात समस्या उद्भवल्यामुळेसुद्धा कंबर दुखू शकते. दोन मणक्मयांमधील चकती स्थल भ्रष्ट झाल्यामुळे किंवा चकतीची पूर्णपणे झीज झाल्यामुळेही हे दुखणे येऊ शकते. बऱयाचदा व्यायाम व औषधे याद्वारे हे दुखणे आटोक्मयात आणता येते.
कंबरदुखीची कारणे
कंबरदुखीचे नेहमीचे कारण म्हणजे स्नायूंवर पडणारा ताण होय. अस्थिसुषिरता यामुळे पाठीच्या कण्यात अस्थिभंग होणे, संधीवात, स्नायूमध्ये पेटका येणे, उभे राहण्याची किंवा बसण्याची चुकीची पद्धत, चकतीची झीज होणे, मणका सरकणे, पाठीचा कणा आणि मणक्मयांमधील चकती या भोवतीच्या स्नायू किंवा अस्थिबंधन अतिरिक्त वापर किंवा त्यांना इजा होणे, गर्भारपणात वजन वाढणे, मणक्मयांना वाक येणे (स्पॉडिलोलिस्थेसिस), पाठीच्या कण्यात दोष निर्माण होणे, पाठीच्या कण्याचा संकोच होणे (स्टेनोसिस), मणक्मयांमधील चकती फाटणे किंवा स्थल भ्रष्ट होणे, श्रमाची कामे किंवा खेळामुळे वारंवार पडलेल्या यांत्रिक ताणामुळे येणारा जैवयांत्रिकी ताण, कदाचित करिभाग किंवा उदराच्या आतील भागांशी संबंधित आसामुळे होऊ शकतो.
कंबरदुखी : धोकादायक बाबी (Risk Factors)
कठोर शारीरिक श्रम, वाढते वय, मधुमेह, धूम्रपान, कौटुंबिक इतिहास, गर्भारपणात वजन वाढणे, जास्तीचे वजन विशेषतः कंबरेभोवती असल्यास स्नायूंवरील ताण व दबाव वाढतो. कंबरेभोवतीचे वजन जास्त झाल्याने कंबर पुढच्या बाजूला खेचली जाते आणि त्यामुळे वेदना होतात, लठ्ठपणा.
कंबरदुखीची लक्षणे
अल्पकाळ वेदना, ज्या काही दिवस किंवा 6 आठवडय़ांपेक्षा कमीकाळ राहतात. अल्पतीव्र 6 से 12 आठवडय़ांपर्यंत वेदना होतात. दीर्घकालीन 12 आठवडय़ांपेक्षा अधिककाळ वेदना होत राहतात. पाठीच्या खालच्या भागापासून खाली पायांपर्यंत आणि कधीकधी गुढघ्यांपर्यंत वेदना पसरत जातात. बधीरपणा किंवा मुंग्या येणे, अचानकपणे व असंयमित शौचास किंवा लघवी येणे, पोटात वेदना होणे, पाठीच्या खालच्या उजवीकडील भागात किंवा डावीकडे किंवा मध्यभागी तीव्र वेदना, चेताउतींना हानी पोहोचल्यामुळे आग होणे किंवा तीक्ष्ण वेदना होणे, यास न्यूरोपैथिक वेदना, असे म्हणतात.
निदान
दुखण्याचे नेमके कारण शोधून काढणे हा निदानाचा मुख्य उद्देश असतो. यासाठी खालील तपासण्या करण्यास सांगितले जाऊ शकते. बोन स्कॅन, एक्स-रे, रक्त तपासणी, बऱयाचशा रुग्णांमध्ये योग्य बंदोबस्त केल्यास काही आठवडय़ातच कंबरदुखी संपुष्टात येऊ शकते.बर्फ ठेवणे आणि शेकणे, आग होत असल्यास कंबरेवर बर्फ किंवा बर्फाची पिशवी ठेवणे फायदेशीर ठरू शकते. शेक दिल्यास किंवा बर्फ ठेवल्यास वेदना कमी होण्याकरता आणि स्नायूवरील ताण कमी होण्याकरता मदत होते. सामान्यतः काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला जातो. पाठीला आधार देण्याकरिता वैद्यकीय साधन (ब्रेसेस) बांधणे, पोटाला आधार देतात आणि त्यामुळे कंबरेवर येणारे वजन कमी होते. हालचालींवर निर्बंध आणून व उठण्या-बसण्याची पद्धत सुधारण्यावर भर दिला जातो.
औषधोपचार
वेदनाशामक, वेदनापासून मुक्ती देते आणि आग होणे कमी करते. गोळय़ांच्या रुपात किंवा त्वचेवर लावण्याचे मलम किंवा स्प्रेच्या रुपात उपलब्ध. उदा. NSAIDS (नॉन-स्टेरॉयडल ऍन्टी-इनफ्लामेटरी औषधे)
स्नायू शैथील्य आणणारी औषधे
स्नायू व हाडांमध्ये वेदना आणि पेटके येणे कमी करण्यासाठी वापरली जातात. कंबरदुखी आणि मानेचे दुखणे यासाठी सामान्यतः NSAIDS (नॉन-स्टेरॉयडल ऍन्टी-इनफ्लामेटरी औषध) सोबतच दिले जाते. उदा. सायक्लोबेंझाप्रिन, मेटाक्सलोन, टोलपेरिझोन, थायोकोल्काकोसाईड.
आकडी थांबविणारी औषधे-
कंबरदुखीसोबत जर पायही दुखत असतील तर त्यासाठी कमी प्रमाणात ही औषधे दिली जातात. Anti-depressants चिंता आणि स्नायूंवरील ताण कमी करतात. यामुळे सिराटोनीनची पातळीही वाढू शकते, जे एक वेदनाशामक न्यूरोट्रान्समीटर आहे.
व्यायाम आणि शारीरिक उपचार पद्धती
व्यायामामुळे पाठदुखीपासून मुक्ती मिळण्यास मदत होते आणि भविष्यात येणारी पाठदुखी किंवा कार्यक्षमता कमी होण्यापासून संरक्षण मिळते. शारीरिक उपचार पद्धतीत याचा समावेश होतो. घरीच करता येऊ शकणारे नियमित व दररोजचे व्यायाम, ज्यात शरीर हळूवारपणे ताणले जाते आणि साधे, मूळ व्यायाम प्रकार केले जाऊ शकतात, लवचिकता देणारे, क्षमता वाढविणारे.
स्नायूंची क्षमता वाढविणारे घरी करता येतील असे अनेक व्यायाम प्रकार आहेत. जे डॉक्टरांच्या सल्ल्याने करणे सहज शक्मय आहे. तुमच्या कंबरेची सुरक्षितता, उठण्या-बसण्याची चुकीची पद्धत आणि अतिरिक्त ताण यामुळे पाठीच्या समस्या येऊ शकतात. उठण्या-बसण्याची पद्धत सुधारणे आणि अतिरिक्त ताण कमी करणे याद्वारे पाठीचे दुखणे कमी करता येते.
पाठीला संरक्षण देणाऱया झोपण्याच्या वेगवेगळय़ा अवस्था, चुकीच्या पद्धतीने उभे राहण्याने पाठीचे अस्थिबंध ताणले जातात आणि पाठदुखी उद्भवते. डोके समोरच्या दिशेला, पाठ सरळ ठेवून ताठ उभे राहा आणि पोक काढणे टाळा. खुर्चीवर बसताना पाठीची काळजी घ्या. सरळ बसा व कंबरेला आधार द्या. निश्चित करा की खुर्ची, टेबल योग्य उंचीवर आहे. जेणेकरून तुम्ही ताठ बसू शकाल व आपले काम आरामशीरपणे करू शकाल. सपाट किंवा कमी टाच असलेले जोडे वापरा. जड वस्तू उचलताना गुडघ्यातून वाका, पाठीतून नव्हे. यामुळे पाठीचे दुखणे टळू शकते. नियमित व्यायाम करा, आपले वजन नियंत्रणात ठेवा, धूम्रपान करणे सोडा.
-डॉ. रविराज घोरपडे (ब्रेन ऍण्ड स्पाईन सर्जन)