- खायला आवडत नसली तरी कच्ची पपई ही आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असते. विशेषतः कावीळ झालेल्या व्यक्तीच्या लिव्हरवर सूज येत असल्यामुळे अशा रुग्णांना कच्ची पपई खाणे फायद्याचे ठरू शकते.
- कच्च्या पपईमध्ये भरपूपर प्रमाणात ‘अ’, ’ई’ आणि ’क’ जीवनसत्त्वे असतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ही जीवनसत्त्वे फायदेशीर ठरतात. सर्दी-पडसाचा त्रास होत असेल तर कच्ची पपई खावी. लघ्वीसंबंधीच्या समस्यांचेही कच्च्या पपईमुळे निराकरण होऊ शकते.
- शरीरावर अनेक ठिकाणी लव म्हणजेच नको असलेले केस उगवतात. ते काढण्यासाठी कच्ची पपई उत्तम आहे. प्रत्येकवेळी व्हॅक्स आणि शेव्हिंग करण्याऐवजी पपईचा वापर करावा. हा उपाय कोणत्याही दुखापतीशिवाय करता येतो.
- हृदयासंबंधी काही आजार झाले असतील त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कच्ची पपई फायदेशीर ठरते. हृदयासंबंधी आजार होण्याची संभावना कमी होते.
- फास्ट फूड खाल्ल्याने पचनशक्ती कमी होते. त्यामुळे अनेक प्रकारचे आजार होतात. पपईमध्ये अनेक प्रकारचे एन्झाईम्स असल्यामुळे पचनक्रिया चांगली होते आणि पचनशक्ती वाढते. शरीराला ऊर्जा देण्यासाठी यातलं डाईट्रि फायबर फायदेशीर असतं. पपईमध्ये भरपूर प्रमाणात असणारं जीवनसत्व ‘अ’ आणि ’क’ हे डोळय़ांसाठी फायदेमंद ठरतात. वय वाढल्यावर दृष्टी कमी होते, पण कच्ची पपई खाल्ल्याने डोळय़ांना फायदा होतो.
अनुजा अरविंद ठाकुर