कणकवली / प्रतिनिधी
कणकवलीचे मुख्याधिकारी श्री. पिंपळे यांना पालघर जिल्ह्यातील डहाणू नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी पदस्थापना देण्यात आली आहे. डहाणू येथील श्री. द्वासे यांची बदली झाल्याने रिक्त झालेल्या पदी कणकवली मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री पिंपळे यांना कणकवली मुख्याधिकारी पदावरून कार्यमुक्त करण्यात येत असून त्यांनी तात्काळ डहाणू येथे रुजू होऊन तसा अहवाल शासनास सादर करावा, असे आदेश शासनाचे अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी काढले आहेत. कणकवलीतील कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या बैठकांना अनुपस्थित राहणे, नगरपंचायतीमध्ये अनुपस्थित राहणे आदी कारणांवरून कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांच्याकडे मुख्याधिकारी पदाचा कार्यभार देण्यात आला आहे
Related Posts
Add A Comment