वार्ताहर / गोकुळ शिरगाव
कणेरीवाडी तालुका करवीर येथे किरकोळ घरगुती वादातून महिलेची आत्महत्या केली आहे.
गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास कणेरीवाडी तालुका करवीर येथील शीला सतीश काळे( वय 29) मूळ राहणार भिमनगर उस्मानाबाद, सध्या राहणार करवीर पाईप कंपनी पुणे बेंगलोर हायवे कणेरीवाडी, या महिलेने खोलीतील लोखंडी अँगलला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली .घरातील किरकोळ वादातून आत्महत्या केल्याची तक्रार अविनाश रोहिदास वाघमारे यांनी शुक्रवारी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात दिली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक एस. एस. संकपाळ.व एन. एस. सावंत हे करीत आहेत.
Previous Articleसातारा : खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात 25 रुग्ण कोरोनाबाधित
Next Article अपघातात काकती येथील तरुण ठार
Related Posts
Add A Comment