तरुण भारत संवाद प्रतिनिधी / करमाळा
करमाळा तालुक्यातील 51 ग्रामपंचायतीच्या निवडणुक प्रक्रियेमध्ये आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 540 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने 861 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. आज शेवटच्या दिवशी 46 उमेदवार बिनविरोध निवडले आहेत. याबरोबरच जेऊरवाडी, सालसे या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
51 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 437 जागेसाठी 1447 जणांचे अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 23 अर्ज अवैध, उर्वरित 1424 उमेदवार पैकी आज उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी 540 जणांनी उमेदवारी माघार घेतली आहे. त्यामुळे जेऊरवाडी तसेच सालसे या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून अन्य ग्रामपंचायतीमधील 30 सदस्य बिनविरोध निवडले आहेत. उर्वरित 391 जागेसाठी 861 उमेदवार निवडणुक रिंगणात उभे राहिले आहेत.
गावनिहाय निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या उमेदवारांची संख्या –
सांगवी – 14, कविटगाव – 18, ढोकरी – 14, निमगाव – 15, झरे – 23, देवळाली – 26, सौंदे – 14, सरपडोह – 5 सदस्य बिनविरोध व 2 जागेसाठी 5 उमेदवार, गुळसडी – 1 बिनविरोध 6 जागेसाठी 17 उमेदवार, कोळगाव – 14, हिसरे – 20, हिवरे – 15, नेरले – 2 बिनविरोध उर्वरित जागेसाठी 20 उमेदवार, भोसे – 14, पिंपळवाडी – 14, वडगाव – 18, घारगाव – 14, बोरगाव – 19, फिसरे – 14, मिरगव्हाण – 14, अर्जुननगर – 14, मांगी – 17, पुनवर – 30 , जातेगाव – 18, बाळेवाडी – 14, साडे – 29, आळसुंदे – 2 बिनविरोध व 11 उमेदवार, शेलगाव(क)- 15, सावडी – 27, उमरड – 25, पांडे – 1 बिनविरोध व 32 उमेदवार, करंजे – 20, दिलमेश्वर – 12 एक बिनविरोध, शेटफळ – 20, केडगाव- 21, कुगाव – 7 बिनविरोध 2 जागेसाठी 4 उमेदवार, पोथरे – 27, आळजापुर – 19, बिटरगाव श्री – 2 बिनविरोध 1 उमेदवार रिंगणात, मलवडी – 18, पाथुर्डी – 1 बिनविरोध 22 उमेदवार, पांगरे – 29, कुंभेज – 19, कोंढेज – 22, श्रीदेवीचामाळ – 19, हिवरवाडी – 15, रोशेवाडी – 2 बिनविरोध 11 उमेदवार रिंगणात, पाडळी – 18, पोटेगाव – 5 बिनविरोध 10 उमेदवार रिंगणात