वार्ताहर / उचगांव
कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी नंतर गांधीनगर परिसर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. गांधीनगर परिसरात कोरोना रुग्णांसाठी अद्ययावत रुग्णालय नाही त्यामुळे सीपीआर शिवाय येथील रुग्णांना पर्याय नाही. गांधीनगर बाजारपेठेत असलेली नेहमीची वाहतूक कोंडी पार करत गंभीर रुग्णाला सीपीआर मध्ये घेऊन जायचे व तेथे बेड नसल्याने संबंधीत रुग्णांवर मृत्यूचे पाळी येणे ही फार गंभीर बाब आहे. म्हणून करवीर पूर्व भागात शासनाने ताबडतोब कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या उपचारासाठी केअर सेंटर उभा करावे याबाबतचे निवेदन कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर व नायब तहसिलदार आंनद गुरव यांना देण्यात आले.
पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजारपेठ म्हणून गांधीनगरची ओळख आहे. मध्यंतरी पहिल्या लॉकडाऊन नंतर ती बाजारपेठ खुली झाली होती. त्या दरम्यान संपूर्ण जिल्ह्यातून येथे ग्राहकांची झुंबड उडाली होती. व्यापाऱ्यांनी व ग्राहकांनी शासकीय नियमांचे पालन न केल्याने कोरोना चा संसर्ग वाढत गेला. आता तर गांधीनगर परिसरात 210 रुग्ण सापडले आहेत. त्याची बाधा उंचगाव, वळीवडे, चिंचवाड व गडमुडशिंगी मध्ये झाली आहे.
करवीर पूर्व भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे. पाच जणांचे मृत्यूही झाले आहेत. कोल्हापूर येथील सीपीआरमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. पण काही वेळा मर्यादा आल्याने तेथे बेड उपलब्ध होऊ शकत नाहीत. दोन दिवसांपूर्वी बेड न मिळाल्याने व्यापाऱ्याचा मृत्यू झाला. म्हणून सीपीआर चा ताण कमी करण्यासाठी करवीर पुर्वभागात मध्यवर्ती ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी व त्यांच्यावरील उपचारासाठी शासनातर्फे कोविड सेंटर उभे करण्यात यावे. इचलकरंजी नंतर गांधीनगर परिसर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. गांधीनगर परिसरात कोरोना रुग्णांसाठी अद्ययावत रुग्णालय नाही. त्यामुळे सीपीआर शिवाय येथील रुग्णांना पर्याय नाही.
गंभीर रुग्णाला सीपीआर मध्ये घेऊन जायचे व तेथे बेड नसल्याने संबंधीत रुग्णांवर मृत्यूचे पाळी येणे ही फार गंभीर बाब आहे. म्हणून करवीर पूर्व भागात शासनाने ताबडतोब कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या उपचारासाठी कोविड सेंटर उभा करावे याबाबतचे निवेदन कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर व नायब तहसीलदार आंनद गुरव यांना शनिवारी देण्यात आले. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपतालुकाप्रमुख पोपट दांगट, युवासेनेचे प्रफुल्ल घोरपडे आदी उपस्थित होते.
Previous Articleसांगली : आटपाडी शहरासह तालुक्यात 18 कोरोना रुग्णांची भर
Next Article सांगली : दिघंचीतील महिला डॉक्टरला कोरोनाची लागण
Related Posts
Add A Comment