बेंगळूर /प्रतिनिधी
कोरोनाव्हायरस-लॉकडाऊन दरम्यान लोकांना प्रवास करण्यासाठी प्रशासनाने ई पासची व्यवस्था केली होती. ई पासच्या माध्यमातून नागरिकांना प्रवास करणे सुलभ झाले. पण यासाठी बेंगळूरस्थित कम्युनिटी मॅनेजमेंट फर्म असलेल्या मायगेटने सहकार्य केले आहे. केएसपी क्लीअर पासची निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी तांत्रिक कौशल्य पुरविल्याच्या योगदानाबद्दल कर्नाटकचे पोलिस महासंचालक प्रवीण सूद यांनी शुक्रवारी कम्युनिटी मॅनेजमेंट फर्म असलेल्या मायगेटचे कौतुक केले. लॉकडाऊनच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात बेंगळूरच्या या मायगेटने दोन लाखांहून अधिक ई-पास राज्य पोलीस दलाला सहाय्य म्हणून दिले होते.